Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

भारतातील वीस कोटी नागरिकांना उच्च रक्तदाब


Main News

भारतातील वीस कोटी नागरिकांना  उच्च रक्तदाब असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले असून, जगभरातील १.१३ अब्ज नागरिक यामुळे त्रस्त आहेत. लंडनमधील इम्पेरिअल कॉलेजमधील शास्त्रज्ञांनी जगभरातील उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांचा अभ्यास केला असून ही संख्या पुढील ४० वर्षांत दुप्पट होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

जगभरातील अर्ध्यापेक्षा अधिक उच्च रक्तदाब असलेले प्रौढ २०१५मध्ये आशियात होते. तर चीनमधील २२६ दशलक्ष लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, असे ‘द लॅन्सेट’ मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. 

१९७५ ते २०१५ या कालावधीत जगभरातील उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधन यात करण्यात आले आहे. तसेच जगभरात २०१५ या वर्षी महिलांपेक्षा पुरुषांनाच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात ५९७ दशलक्ष पुरुषांना तर  ५२९ दशलक्ष महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

उच्च उत्पन्न गटातील देशांतून उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी होत असून कमी आणि मध्यम उत्पन्न गटांतील विशेषत: आफ्रिका आणि दक्षिण आशियातील देशांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. ब्रिटन आणि युरोपातील देशांमध्ये तसेच दक्षिण कोरिया, अमेरिका आणि कॅनडा या देशांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण कमी आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin