Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

थंडीत घ्या आरोग्याची काळजी


Main News

ऑक्टोबर हिटच्या झळानंतर राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. तापमानाचा पारा घटला असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. थंडी वाढल्यामुळे श्वसनासंबधीचे आजार आणि सांधेदुखीचे प्रमाण वाढते.

वातावरणातील बदलांचा परिणाम हा आरोग्यावर होतो. या काळात सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढते. हवेतील बदलांमुळे आजार वाढल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. सर्दी-खोकल्याबरोबरच सायनसचा त्रासही वाढतो. थंडीच्या काळात वाढणाऱ्या धुक्याचा परिणाम प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर होतो. त्यामुळे या काळात श्वसनासंबंधीचे आजार बळावतात. घशाला संसर्ग होतो. त्याचबरोबर, श्वसनसंस्थेला संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होतो. 

दमा असणाऱ्या रुग्णांना या काळात अधिक त्रास वाढतो. दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडी वाढायला सुरुवात झाल्यावर या रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. थंडी लागू नये, म्हणून गरम कपडे घातले पाहिजेत. योग्य वेळी औषधे घेतली पाहिजेत. थंडीत सांधेदुखी बळावते. सकाळी उठल्यावर सांधे आखडण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास टाळण्यासाठी सांधेदुखी असलेल्या व्यक्तींनी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin