Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

कमी शारीरिक तंदुरुस्तीने टाळता येतो हृदयरोग


Main News

- सरासरी व्यक्तींच्या २० टक्के कमी शारीरिक तंदुरुस्ती असली तरीही हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे विकार टाळले जातात, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ‘जर्नल ऑफ कार्डिओपल्मोनरी रिहॅबिलिटेशन अँड प्रिव्हेन्शन’ या वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत.

जे लोक हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. त्यांच्या तंदुरुस्तीत लहानसे बदल झाले तरी ते पुरेसे आहे. तंदुरुस्तीचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही काही पट्टीचे धावपटू किंवा खेळाडू असण्याची गरज नाही, असे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आणि कॅनडामधील माँट्रियल विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनियल कर्नियर यांनी सांगितले.

या अभ्यासात सहभागी असलेल्या मॅक्सिम कारू यांनी सांगितले की, व्यायामाचा आणि चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीचा एकंदर तब्येतीवर आणि हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होतो हे यापूर्वीच्या संशोधनातून माहीत होते. पण सर्वसाधारण तंदुरुस्त व्यक्तींपेक्षा २० टक्क्यांनी कमी तंदुरुस्ती असलेल्या व्यक्तींनीही थोडासा नियमित व्यायाम केला तर त्यांनाही त्याचे चांगले फायदे मिळू शकतात, हे या नव्या संशोधनातून दिसून आले.

संशोधकांनी हृदयविकार असलेल्या २०५ पुरुष आणि ४४ स्त्रियांवर प्रयोग केला. त्यांना काही काळ व्यायाम करण्यास लावला. त्यातून असे दिसून आले की हृदयविकार बळावण्यासाठी असलेल्या आठपैकी पाच धोकादायक मुद्द्यांच्या बाबतीत कमी तंदुरुस्त नागरिकांनी केलेल्या व्यायामाचाही उपयोग होतो. त्यात कमरेचा घेर, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा आणि अत्याधिक वजन अशा मुद्द्यांचा समावेश होता.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने सुचवल्याप्रमाणे आठवड्यात १५० मिनिटे साधारण व्यायाम किंवा ७५ मिनिटे जोरदार व्यायाम करणे लाभदायक ठरते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin