Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

सायकल चालवा, मधुमेह पळवा


Main News

- दिवसभरात जे लोक आपल्या मर्यादेच्या आत किमान शारीरिक व्यायाम करतात, त्यांना ‘टाइप २’चा मधुमेह न होण्याची शक्यता ही ४० टक्के असल्याचा दावा नवीन संशोधनातून करण्यात आला आहे.

या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, आठवड्यातून किमान १५० मिनिटे उत्साहाने चालण्याने किंवा सायकल चालवण्याने एखाद्या व्यक्तीला टाइप २चा मधुमेह होण्याची शक्यता २६ टक्क्यांनी कमी होते, असे युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन (यूसीएल) आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम (युके)च्या संशोधकांनी म्हटले आहे.

या वेळी संशोधकांनी उत्साह आणणाऱ्या आणि शारीरिक व्यायामाला कारणीभूत असणारे खेळ म्हणजेच वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा दुहेरी टेनिस यांसारख्या खेळांना अधिक प्राधान्य देण्याचे सुचविले आहे.

२०१२ सालच्या इंग्लंडमधील आरोग्य सर्वेक्षणानुसार, वयस्कांपैकी अनेकांकडून याचे पालन होत नसून सर्वेक्षणानुसार कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम हा आरोग्याला हितकारकच असतो. तसेच जे लोक आपल्या मर्यादांपेक्षा त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात ते अधिक हितकारक असल्याचेही म्हटले आहे. या वेळी संशोधकांनी अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप येथील संकलित माहितीचेही विश्लेषण केले. यापूर्वीच्या संशोधनात नेहमीचा आहार आणि कवायतींमुळे शारीरिक आजारांना वेगळे ठेवणे कठीण जात होते, पण नवसंशोधनातून जागतिक स्तरावर पसरत असलेल्या टाइप २ च्या मधुमेहावर परिणामकारक असल्याचे दिसून आल्याचे यूसीएलचे अ‍ॅण्ड्रे स्मित यांनी म्हटले आहे.  हे संशोधन डायबेटोलोजिया या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin