Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

मानवी आहारातील अंडयाचे महत्त्व आणि वस्तुस्थिती


Main News

पुणे दि. १० (पीसीबी) - अंडी हे निसर्ग निर्मित अन्न आहे. अंडयांमध्ये शरिराची जडणघडण करणारी प्रथिने आणि ९ अत्यावश्यक अमिनो ऍ़सिडस् असतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असलेल्या प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व स्निग्ध पदार्थ या पोषण मूल्यांचे संतुलित प्रमाण अंडयामध्ये असते. कोंबडीच्या साधारण आकाराच्या अंडयापासून सरासरी ६६ किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या ३ टक्के असते. “राष्ट्रीय पोषण संस्थेच्या”  शिफारशीनुसार राज्यात दरडोई  प्रतीवर्ष १८० अंडयांची आवश्यकता आहे. सध्या दरडोई महाराष्ट्रात ४५ अंडी उपलब्ध होतात.

अंडयांमधील  प्रथिनांचा पोषणाच्या बाबतीत आईच्या दूधानंतर दुसरा क्रमांक लागतो. तसेच अंडयातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात व सर्व वयोगटातील लोकांना सहज पचतात. अंडयाच्या बलकातील कोलीन हे गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. वाढत्या वयाची मुले, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता व आजारातून उठलेले रुग्ण यांचेकरिता अंडे हे अतिशय आवश्यक व पोषक अन्न आहे. अंडी खाल्याने मांस पेशीतील ग्लुकोजचा चांगल्या प्रमाणात वापरही होतो म्हणून खेळांडुसाठी, शरीर कसरतीचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या आहारात तर अंडी अतिशय उपयुक्त ठरतात. अंडयातील पेप्टाईड उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

अंडयामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करता येत नाही. त्यामुळे उच्च प्रतीची प्रथीने कमीत-कमी किंमतीत व सहजासहजी उपलब्ध होण्याचे माध्यम असलेल्या अंडयाचा दैनंदिन आहारात समावेश असणे महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा/राज्याचा कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. यासाठी अंडयासारख्या प्रथिने व उर्जा असणाऱ्या घटकाचा समावेश बालके, गरोदर महिला तसेच इतर सर्वांच्याच आहारामध्ये असणे आवश्यक आहे. मध्यान्ह पोषक आहारामध्ये देशातील १४ राज्ये अंडयांचा वापर करतात. तामिळनाडू व आंध्रप्रदेश यात अग्रेसर आहेत.

 १४ ऑक्टोबर, रोजी राज्यात सर्व जिल्हयात तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, तसेच पशु आहार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या डीएसएम, या कंपन्यांचा सक्रीय सहभाग आहे. या माध्यमातून किमान १५ लक्ष उकडलेली अंडी राज्यभरातील अंगणवाडया, प्राथमिक शाळा व सरकारी दवाखाने येथे लोकसहभागातून मोफत वाटण्यात येणार आहे.

अंडयातील पोषणमूल्याचे मानवी आहारातील महत्व या विषयी जनमानसात जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेने घोषीत केल्याप्रमाणे ‘जागतिक अंडी दिन’ दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी साजरा करण्यात येतो. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात येत्या १४ ऑक्टोबर रोजी जागतिक अंडी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  याबाबतचा मुख्य कार्यक्रम पुणे येथे होईल. यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत शाळांमधील इयत्ता १ ली  ते ४ थी तील विद्यार्थ्यांना उकडलेल्या अंडयांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
                                                                                                                
- जयंत कर्पे, माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin