Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

मूत्रपिंडाचे आजार


Main News

शरीरातील इतर अवयवांप्रमाणे मूत्रपिंडाचे ही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. काही आजार जन्मजात दोषांमुळे होतात तर बाकी बरेचसे आजार विविध कारणांमुळे होऊ शकतात.

मुत्रपिंड म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला किडनी म्हटले जाते. याची शरीरातील संख्या दोन असून, उदरपटलाच्या मागच्या बाजूला पाठीच्या खालच्या कण्याच्या दोन्ही बाजूला त्या असतात. पूर्ण वाढ झालेल्या पुरुष आणि महिंलामध्ये किडनीची लांबी साधारण ९.५ ते १० से.मी असून त्यांचा आकार चवळीच्या दाण्यासारखा असतो. ही मूत्रपिंड मूत्रनलिकेव्दारे मूत्राशयाला जोडलेली असतात. मूत्रनलिके बरोबरच एक रोहणी आणि नीला ही मूत्रपिंडाच्या खोबणीमध्ये असतात. मूत्रपिंडाच्या खोबणीमध्ये असतात. मूत्रपिंडाचा सर्वात छोटा घटक ज्याला नेफरॉन (Nephron) असे म्हणतात. त्यामध्ये गाळण्यासारखी पटले असतात. जेव्हा रक्तप्रवाह अनेक छोट्या केशवाहिन्यांमधून या नेफरॉन्समधून फिरतो, त्यावेळी त्यातील दुषित पदार्थ गाळून घेतले जातात. रक्ताचे शुध्दीकरण केले जाते आणि ते रक्त ह्दयाकडे पाठवले जाते. दूषित पदार्थांबरोबर पाणी आणि क्षार यांचे ही नियमन मूत्रपिंडाव्दारे केले जाते. शरीराला हानीकारक दुषित पदार्थ आणि अतिरिक्त क्षार, पाणी यांचे रुपांतर लघवीमध्ये होते आणि मूत्रनलिकांव्दारे ही लघवी मूत्राशयामध्ये पाठविली जाते. वेळोवेळी शरीरातून ती उत्सर्जित केली जाते. मूत्रपिंड ज्याप्रमाणे रक्तशुध्दीकरण आणि पाणी क्षार नियमनाचे कार्य करतात. त्याचप्रमाणे रक्तदाबाचे नियमन, रक्त बनवण्यासाठी संप्रेषण (Hormone) बनवणे तसेच हाडांतील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे निमनगी मूत्रपिंड करतात.

शरीरातील इतर अवयवांप्रमआणे मूत्रपिंडाचे ही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. काही आजार जन्मजात दोषांमध्ये एका मूत्रपिंडांचा जन्मजात अभाव किंवा त्याची वाढ न होणे, दोन्ही मूत्र पिंड खालच्या बाजूने चिकटलेली असणे ज्याला हॉर्स शू किडणी (Horse Shoe kindney) किंवा घोड्याच्या नालासारखी दिसणारी किडनी असे म्हणतात. मूत्र वाहक नलिकांचे तोंड मूत्राशयात न उघडता दुसऱ्या भागात उघडणे. मूत्र वाहक नलिकेचे तोंड अरुंद असणे किंवा मूत्राशयाच्या आतल्या बाजुला एक पटल असणे किंवा मूत्राशयाच्या आतल्या बाजूला एक पटल असणे जे पुरुषांमध्ये आढळते. ज्यामुळे दोन्ही मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. मूत्रपिंडामध्ये छोट्या फुग्यासारखा पिशव्या म्हणजे मल्टिपल सिस्टम (Multiple Cysts) तयार होणे, अशा अनेक प्रकारचे मूत्रपिंड आणि मूत्रमार्ग यात दोष आढतात. यापैकी शस्त्रक्रियेने काही दोष दूर करता येतात तर काहींमुळे मूत्रपिंडाचे कार्य मंदावते.

मूत्रपिंड व मूत्रामार्गामध्ये जंतू संसर्गामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण ही खूप आहे. स्त्रियांमध्ये विशेषत: योनी मार्ग, मूत्रमार्ग आणि शौचमार्ग एकमेकांच्या जवळ असल्यामुळे मूत्राशयाच्या आणि खालील मूत्रमार्गाला अर्थात आजारांचे प्रमाण पुरुषांचे तुलनेत जास्त आढळते. मूत्रमार्गातील काही दोषांमुळे उदाहरणार्थ मूत्रनलिका आणि मूत्राशय यामधील झडप योग्य काम करत नसेल तर मूत्र शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला वेळेस काहीमध्ये लघवी परत मूत्राशयातून मूत्र नलिकेमध्ये शिरते. कधीतरी ती मूत्रपिंडापर्यंत ही पोहचू शकते आणि त्यामुळे मूत्राशयातील जंतूसंसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोहचू शकतो. जंतूसंर्गामुळे होणारे आजार बऱ्याच प्रमाणात औषधांनी आटोक्यात आणता येतात तसेच ते होऊ नये म्हणून काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. जसे मूत्र मार्ग आणि शौच मार्गाची स्वच्छता राखणे, हवामानाला अनुसरुन योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे, जसे उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे तसेच जास्त वेळ लघवी रोखून न ठेवता वेळोवेळी लघवीचा निचरा करणे, काही लक्षणे दिसल्यावर त्वरीत त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin