Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

मधुमेहाच्या रुग्णांना नित्यनियमाने व्यायाम करणे आवश्यक: स्वीडिश शास्त्रज्ञांची माहिती


Main News

नित्यनियमाने व्यायाम करणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. पण टाइप टूमधुमेह झालेल्या रुग्णांना व्यायामाची आवश्यकता अधिक आहे. दररोज अधिक प्रमाणात व्यायाम केल्यास टाइप टूमधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, असा दावा स्वीडनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

 

टाइप टूमधुमेह होण्याची कारणे अनुवांशिकता किंवा बदलती जीवनशैली ही आहेत. जर कुटुंबीयांकडून (माता, पिता, भावंडे) यांच्याकडून रुग्णाला टाइप टूमधुमेह झाल्यास त्याचा धोका तीन पटीने अधिक असतो. योग्य आहार, सकस आहार आणि व्यायाम यांमुळे हा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. मात्र स्वीडिश शास्त्रज्ञ म्हणतात की, जर टाइप टू मधुमेह झालेल्या रुग्णांना व्यायामावर भर दिल्यास या विकारावर नियंत्रण मिळवणे अधिक सुलभ जाईल.

 

स्वीडनमधील लुंड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी टाइप टू मधुमेहाच्या रुग्णांवर व्यायामाचा परिणामया विषयावर अभ्यास केला. टाइप टू मधुमेहींनी व्यायाम करणे खूपच आवश्यक आहे. कारण या रुग्णांचे वजन अतिरिक्त प्रमाणात वाढलेले असते, त्याशिवाय त्यांचा रक्तदाबही उच्च असतो.


या शास्त्रज्ञांनी टाइप टू मधुमेह झालेल्या काही रुग्णांवर अभ्यास केला. त्यांचे गट तयार करून त्यांच्याकडून सहा महिने व्यायाम करून घेतला. या रुग्णांसाठी दर आठवडय़ाला तीन विविध सत्रे आयोजित केली. एक सत्रात त्यांच्याकडून स्पीनिंग क्लासद्वारे आणि दोन सत्रात एरोबिक्सद्वारे कसरती करून घेतल्या. व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय चाचणी करण्यात येत असे. या चाचणीत त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले जाई.

 

‘‘अधिक प्रमाणात व्यायाम करणे या रुग्णांना कठीण जात असे. पण तज्ज्ञांनी त्यांच्याकडून या कसरती करून घेतल्या त्याचा चांगला परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. व्यायामामुळे या रुग्णांचे वजनही घटले आणि त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाले. त्यामुळे टाइप टू मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे,’’ असे या संशोधकांच्या गटप्रमुख ओला हॅन्सन यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin