Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

अवेळी जेवण करणे आरोग्याच्यादृष्टीने धोकादायक


Main News

 रात्री उशिरा जेवण करायची सवय असल्यास, तर ती तुमच्या शरीरास अपायकारक आहे. या सवयीचा तुमच्या शरीरातील अंतर्गत क्रियेवर खोलवर विपरित परिणाम होऊ शकतो. रात्री ७ ते ९ ही वेळ रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असल्याचे ब्रिटनमधील एका पाहाणीत समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधकांनी उच्च रक्तदाबाने प्रभावित ७०० वयस्करांवर या बाबतचे प्रयोग केले. याअंतर्गत संशोधकांनी सर्व ७०० जणांना वेगवेगळ्या वेळी जेवण आणि न्याहारी दिली. अवेळी खाण्याचा शरीरावर होणाऱ्या परिणामांचे आकलन करणे हा या संशोधनाचा उद्देश होता. रात्री उशिरा जेवल्याने अनेक व्याधींना निमंत्रण देण्याबरोबरच आरोग्याशी निगडीत अन्य समस्यादेखील उद्‌भवत असल्याचे या संशोधनातून समोर आले.

वेळेवर न जेवल्याने मिळेल ते खाण्याकडे आपला कल असल्याचे या पाहणीतून समोर आले. मिळेत ते खाल्याने शरीरातील कॅलेरिज वाढण्याबरोबरच आपण शरीराला पोषक नसलेल्या आहाराचीदेखील निवड करतो. अशाप्रकारचा आहार आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतो. अवेळी खाणे म्हणजे झटपट काहीतरी तोंडात टाकणे अथवा चालता चालता खाता येऊ शकेल अशा पॅक्ड फूडचे सेवन करणे. हे खाद्यपदार्थ शरीराला ना उर्जा देत ना कुठला फायदा पोहोचवतात; किंबहुना अशा खाद्यपदार्थांमुळे शरीराला नुकसानच होते.

अयोग्यवेळी आहाराचे सेवन अथवा चुकीचा आहार घेतल्याने शरीरात कॉलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. नियमित आणि योग्यवेळी आहार घेणारे उत्तम जीवन जगत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. जेवणाच्या वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अथवा उशिराने डिनर करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. आपल्या शरीराची रचना नियमितपणा तसेच वेळेचे पालन करणारी अशी असते. रात्री उशिरा जेवल्याने मेटॉबॉलिझम सुस्त होतात, परिणामी जाडेपणा आणि हृदयविकाराच्या धोक्यात वाढ होते. रक्तदाबावरदेखील अतिशय विपरीत परिणाम होतो. झोपायला जाण्याआधी दोन तासांपर्यंत काहीही खाऊ नये. यामुळे शरीरात हाय अलर्ट परिस्थिती निर्माण होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin