Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे ५० टक्के विकार कमी


Main News

दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे ५० टक्के विकार कमी होतात. ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी तर चालणे वरदानच आहे. अशा व्यक्तींनी दररोज चालले तर हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने घटू शकेल, असा निष्कर्ष ‘युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस’ने केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.

संशोधकांनी ६५ ते ७४ या वयोगटातील २,४६५ पुरुष आणि महिलांवर हे संशोधन केले. या लोकांच्या शारीरिक कृतींवर लक्ष ठेवण्यात आले. जे लोक दररोज चालतात, त्यांच्यातील हृदयविकाराचा धोका टळलेला आढळल्याचे या संशोधकांनी सांगितले. दिवसातून किमान अर्धा ते एक तास चालणे गरजेचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.

६५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या व्यक्तींना बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी जडतात. जसे हृदयविकार, मधुमेह, पक्षघात, स्थुलता आदी. त्यासाठी त्यांच्या शरीराला चालना देणे आवश्यक आहे. जर चालण्याचा व्यायाम दररोज केला तर या विकारांचे निराकरण होऊ शकते. हृदयविकार तर चालण्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

वाढत्या विकासाबरोबर आपण चालणेही विसरलो आहोत. जवळपासही कुठे जायचे असेल तरीही आपल्याला रिक्षा, टॅक्सी किंवा स्वत:चे वाहन लागते. चालणे टाळल्यामुळे अनेक विकारांचा सामना करावा लागत आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin