Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

अयोग्य पद्धतीने वजन घटविल्यास हृदयविकाराचा धोका


Main News

धूम्रपान तसेच धोकादायक पद्धतीने वजन कमी केल्यास हृदयविकार व संबंधित आजार होण्याचा धोका अधिक असतो, असा निष्कर्ष नॅशनल हार्ट इन्स्टिटय़ूटने संशोधनातून काढला आहे.

त्यासाठी १ जून २०१२ ते १० ऑगस्ट २०१६ या कालावधीत १ लाख २० हजार ४४४ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या पाच वर्षांच्या कालावधीत हृदयरुग्णांच्या संख्येत १० टक्के वाढ झाली आहे. त्यातही ४० वर्षांखालील रुग्णांमध्ये ही वाढ २८ टक्के आहे. तसेच रजोनिवृत्तीकडे झुकलेल्या महिलांमध्ये जीवनशैलीशी संबंधित घटकांमुळे हृदयविकाराशी संबंधित व्याधींच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याला पोषक आहाराचा अभाव, ताणतणाव, कोणत्याही सल्ल्याशिवाय वजन कमी करण्याचे खूळ अशी कारणे सांगता येतील. या संस्थेच्या हृदयरोग सेवा विभागाचे प्रमुख विनोद शर्मा यांनी सांगितले.

गेल्या वर्षांत बदललेली जीवनशैली पाहता जनतेमध्ये याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच रोजच्या जगण्यातील ताण-तणाव कसे कमी करता येतील, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. तरुण व महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे या अभ्यासात उघड झाले आहे. त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी या दृष्टीने संस्थेतर्फे जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin