Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

स्तनपान जागृतीसाठी ‘मेडेला इंडिया’च्या वतीने मोहीम


Main News

नवजात बालकासाठी आईचे दूध नेहमीच महत्त्वाचे आणि पौष्टिक असते. मात्र अनेकदा नवजात बालकांना मातेच्या दुधापासून वंचित राहावे लागते. स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आई-मुलीच्या नात्यावर भर देत ऑस्ट्रेलियातील ‘मेडेला इंडिया’ या कंपनीतर्फे भारतात एक मोहीम राबवण्यात येत आहे. 

मातांनी आपल्या नवजात बालकांना स्तनपान द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्रेस्टफीडिंग अ‍ॅड द फाऊंडेशन फॉर अ चाइल्डस बेटर अँड हेल्दिअर टुमारू’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. स्विर्त्झलंड येथील एका वैद्यकीय कंपनीच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत मातांमध्ये व्हिडीओद्वारे जागृती केली जाणार आहे. कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ४१.४९ टक्के माता आपल्या तान्हुल्याला स्तनपान कसे द्यावे यासाठी त्यांच्या आईकडून सल्ला घेतात. नेमका हाच दुवा साधत हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आई-मुलीमधील सुंदर नाते उलगडताना स्तनपानाचे महत्त्व, त्यात येणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत. कोणतीही मुलगी याबाबत आपल्या आईशीच प्रथम संवाद साधते हेच ध्यानात घेत हा व्हिडीओ बनविण्यात आल्याचे कंपनीद्वारे सांगण्यात आले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin