Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

गणरायाच्या स्वागतासाठी घराची सजावट


Main News

सार्वजनिक गणपतीच्या सजावटीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व घरगुती गणपतीच्या सजावटीलासुद्धा आहे. गणपतीची मूर्ती अगदी आकर्षक घेतली जाते. मग अशी मनमोहक मूर्ती असल्यावर मूर्तीच्या आजूबाजूची सजावटदेखील तशीच आकर्षक लागते. काही जण तर घरगुती गणपतीच्या सजावटीत दरवर्षी थीमनुसार वेगवेगळी सजावट करतात तर काही जण साधेपणाला महत्त्व देतात. काही जण नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट करतात. आपल्या गणपतीची सजावट सगळ्यात सुंदर दिसावी म्हणून सगळेच जण सजावटीकडे विशेष लक्ष देतात. लोकांच्या सजावटीचा वाढता कल पाहून सजावटीच्या साहित्यालाही महत्त्व आलं आहे.

या वस्तूंनाही महागाईची झळ पोहोचली आहे. घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक, सजावटीशिवाय गणेशाची प्रतिष्ठापना होणंच शक्य नाही. त्यात सगळ्यांकडेच वेळेचा अभाव असल्यामुळे कमीत कमी वेळात आपल्या लाडक्या गणरायाच्या सजावटीत काय करता येईल याकडेच सगळ्यांचं लक्ष असतं. खर्चाचं बजेट पाहता सजावट करताना सगळ्यांनाच दम लागतोय. तरीही सजावटीसाठी लागणारं साहित्य हे नव्या प्रकारातलं आणि बदलत्या फॅशननुसार घ्यावं, असं सर्वानाच वाटतं.

सजावट करण्यासाठी जास्त ताण घेण्याची गरज नाही. कारण, हल्ली सगळं काही तयार मिळतं. त्यात सगळ्यात जास्त मागणी आहे ती थर्माकोलच्या मखरांना. थर्माकोलचं नक्षीदार मखर दिसायला खूपच सुंदर असतं. विविधांगी डिझाइन आणि आकर्षक रंगसंगतीचा अनोखा मिलाफ म्हणजे मखर. त्यात सहजतेने हाताळता येतील अशी फोल्डिंग मखरंही बाजारात उपलब्ध आहेत. फुलं, बाग, इंद्रधनुष्य, सूर्यफूल, पाळणा असे त्यात विविध प्रकार आहेतच. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वत:देखील अशी सजावट करू शकता. आकर्षक आणि वेगवेगळ्या रंगांच्या ओढण्या घेऊन त्या मूर्तीच्या चहुबाजूंना लावू शकता. त्यावर स्पॉटलाइट सोडू शकता. फुलांची आर्टीफिशिअल वेल किंवा फुलंही तुम्ही आजूबाजूला ठेवू शकता.

 

तुमच्याकडे वेळ आणि खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही स्वत: पुठ्ठय़ांचे चित्र काढलेले देखावे तयार करू शकता आणि त्यावर कृत्रिम वेली आणि फुलं लावू शकता. खर्च करायचा नसेल आणि नैसर्गिक सजावट करायची असेल तर तुम्ही तुमच्या बागेतील फुलांची किंवा शोभेची सुंदर झाडं गणपतीच्या बाजूला ठेवू शकता. गणपतीच्या पाठी असणा-या भिंतीवर सुंदरशी हिरवी किंवा काठापदराची साडी लावून बघा, तीही  मस्त वाटेल. ज्यांना चांगलं चित्र काढता येत असेल त्यांनी मोराचं सुंदर चित्र काढून ते गणपतीच्या पाठच्या भिंतीवर लावावं. अशाच प्रकारे तुम्ही मोरपिसांची सजावटही करू शकता. तुमच्याकडे दीड दिवसांचा किंवा तीन दिवसांचा गणपती येत असेल तर तुम्ही नैसर्गिक फुलांची सजावट करू शकता.

 

या सगळ्या सजावटीमध्ये नैसर्गिक फुलांची सजावट जास्त चांगली दिसते. त्या सजावटीबरोबर चकचकीत कापड घेऊन लावलं तर तेही छान दिसतं. यात आणखी चांगला आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही गणपतीजवळ वेगवेगळ्या आकारातल्या पणत्या लावू शकता. पण असे तेलाचे दिवे लावत असाल तर सतत कोणीतरी घरात असणं गरजेचं आहे. तसंच त्याला लहान मुलांचा हात लागणार नाही, याचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. दिव्यांच्या आणि फुलांच्या सजावटीमुळे घरात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होते. कमी दिवसांचा गणपती असणा-यांना तर आणखी गोष्ट करता येईल. बाजारात दुर्वाची घट्ट वीण मिळते. ती वीण तुम्ही गणपतीच्या मागच्या बाजूला लावून त्यावर लाइटिंग केलंत तरी छान दिसेल. दुर्वा किंवा फुलं वर्तुळाकार सजवा आणि ती गणपतीच्या वर लावा. हे वर्तुळ तुम्ही पुठ्ठयाचं तयार करू शकता.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin