Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

...तर मुलाखत होईल, आनंददायी!


Main News

मुलाखतीला जाताना ताण येणे स्वाभाविक आहे. मात्र याच तणावात जर तुम्ही मुलाखतीला गेलात तर तो तणाव तुमच्या चेहऱ्यावरही दिसेल. मुलाखतीची १० ते १५ मिनिटे तुमची गुणवत्ता ठरवू शकत नसली तरी मुलाखतीला जाताना काही पथ्य पाळली, तर मुलाखत आनंददायी होईल.

मुलाखतीच्या खोलीत गेल्यावर सगळ्यांना प्रसन्न चेहऱ्याने नमस्कार अथवा हस्तांदोलन करुन अभिवादन करा. तुम्ही इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलू शकत नसाल तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्याबद्दल मुलाखतकाराला सांगा. 

ज्या कंपनीत मुलाखती जात आहात, तिथे काम करणे तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ते पटवून द्या. त्या कंपनीच्या चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या कंपन्यांपैकी ती एक आहे, हे सांगयला विसरु नका.

कंपनी किंवा संस्थेची तत्व आणि तुमची व्यावसायिक तत्व यात साम्य दाखवून द्या. तुम्ही ज्या पदासाठी जात आहात ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे सांभाळू शकता हे आत्मविश्वासाने पटवून द्या. स्वतःबाबातदेखील तो आत्मविश्वासात बाळगा.

उत्तरे नीट विचार करून प्रामाणिकपणे द्या. पण, नेमकी काय उत्तर द्यायची असा प्रश्न नेहमी पडतो. अशावेळी तुमच्या व्यक्तिमत्वाचा थोडा परिचय होईल, असे उत्तर द्या. कामाच्यावेळी चिडचिड होते, राग पटकन येतो, मनासारखे झाले नाही तर राग येतो अशी उत्तर देणे शक्यतो टाळा.

यावेळी आधीच्या कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगाराचा आकडा तुम्ही सांगू शकता. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जायचे असते, मी ही आधीपेक्षा चांगलेच मिळेल अशी अपेक्षा करत आहे, असे सांगू शकता. पण, जर तुमची ही पहिलीच नोकरी असेल तर इतर उमेदवारानी जो पगाराचा आकडा सांगितला असेल, किंवा त्या पदाला जो पगार साजेसा असेल असे उत्तर द्या.

यात फक्त स्वतःच्या फायद्याचेच बोलू नका. तुमच्यामुळे कंपनीला पुढील पाच वर्षात किती फायदा होईल आणि त्यातून कंपनीची प्रगतीही होईल याबद्दलही बोला.

कोणतेही काम टीमशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुमची संकल्पना त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा पण त्यात कोणतीही जबरदस्ती नको. जर सहकाऱ्यांना तुमची संकल्पना पटत नसेल तर तुम्हाला ती कल्पना सोडून टीमबरोबर जावे लागेल.

मुलाखत संपल्यानंतर मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानायला विसरु नका. जर त्यांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली तर तुम्ही त्यांच्याकडे प्रतिक्रिया मागू शकता. त्यांच्या प्रतिक्रियेतून तुम्हाला खूप शिकता येईल, असेही तुम्ही सांगू शकता.
 
 
 
 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin