Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

फ्लिपकार्टच्या मिंत्राकडून जबाँगची खरेदी


Main News

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) - फ्लिपकार्टचा मालकी हक्क असलेल्या मिंत्रा कंपनीने ऑनलाइन फॅशन संकेतस्थळ जबाँगचे अधिग्रहण केले असून यासाठी किती रक्कम खर्ची घातली जाईल याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. २०१४ मध्ये फ्लिपकार्टने जवळजवळ २००० कोटी रुपयांत मिंत्राची खरेदी केली होती. जबाँगच्या अधिग्रहणाने भारतातील फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात फ्लिपकार्ट ग्रुप निर्विवादपणे अग्रणी राहणार आहे. 


भारतातील फॅशन मल्टिब्रॅण्डपैकी जबाँग एक आहे. यात १५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड, स्पोर्ट्स लेबल, भारतीय एथनिक आणि डिझायनर लेबलचा समावेश असून, दीड लाखांहून अधिक स्टाइल्स असल्याचे मिंत्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जबाँगकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मिंत्रा आणि जबाँगचे मिळून जवळजवळ दीड कोटी युजर्स आहेत. दोघांकडे डोरोथी पर्किंस, टॉपशॉप, टॉम टेलर, जी रॉ स्‍टार, बुगाटी शूज, द नॉर्थ फेस, फॉरेवर २१, स्‍वारोव्‍स्की, टिंबरलँड आणि लेकोस्‍टेसारखे ब्रॅण्ड आहेत. 

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि एक्झुक्युटिव्ह चेअरमन सचिन बंसल यांनी टि्वटरच्या माध्यमातून जबाँगचे आपल्या परिवारात स्वागत केले. फ्लिपकार्ट परिवारात जबाँगचे स्वागत आहे. आपण एकत्रपणे इतिहास रचू या, असा संदेश त्यांनी टि्वटरवर पोस्ट केला आहे. २०१२ मध्ये सुरू झालेली जबाँग गेल्या काही काळापासून खरेदीदाराच्या शोधात होती. काही काळासाठी तिने मिंत्रासमोर कडवे आव्हानदेखील उभे केले होते. २०१४ मध्ये नुकसान सोसावे लागलेल्या जबाँगच्या खरेदीसाठी स्नॅपडील आणि आदित्य बिर्ला ग्रुपदेखील उत्सुक होते.

">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin