Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

चालत मीटिंग घेणे कर्मचाऱ्यांच्यासाठी आरोग्यदायी


Main News

कंपनीतील बैठक म्हटली की डोळ्यांपुढे एका अलिशान हॉलमधील टेबल खुर्चीवर बसलेल्या बैठकीचे चित्र येते. मात्र या नेहमीच्या पद्धतीपेक्षा आठवड्यातून एकदा चालत चर्चा (मीटिंग) घेणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. 

कार्यालयात बहुतांश बैठे काम असते. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी ही पद्धत उपयुक्त आहे. त्यामुळे चालत चर्चा करण्याबाबत अभ्यास करण्यात आला. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक असल्याचे मियामी विद्यापीठातील प्रा. अल्बटरे जे कॅबन मार्टीनेझ यांनी स्पष्ट केले. अशा चालत होणाऱ्या चर्चाना अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे, त्यातून कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अशा चर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा तीन आठवडे अभ्यास करण्यात आला. पहिल्या आठवड्यात १०७ मिनिटांपासून ते तिसऱ्या आठवड्यात ११७ मिनिटांपर्यंत क्षमतेत वाढ झाल्याचे चित्र दिसले. हे निष्कर्ष पाहता नोकरदार वर्गाला चालतच चर्चा घेणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते, असे मियामी विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विज्ञान शाखेचे हनन किंग यांनी स्पष्ट केले. 

या पूर्वी एका अभ्यासात दररोज १५ मिनिटे जोरात चालतात त्यांचे आयुर्मान तीन वर्षांनी वाढल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच चालणे हा चांगला व्यायाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच धर्तीवर चालत कार्यालयीन चर्चा केली तर फायदा होतो असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin