Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

निसर्गाच्या सानिध्यात रहा, नैराश्य घालवा !


Main News

रोज तीस मिनिटे चालण्याने नैराश्य कमी होते, तसेच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो, आणि मानसिक आरोग्य सुधारते असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात ज्या व्यक्ती जादा वेळ व्यतीत करतात त्यांना इतरांच्या तुलनेत कमी नैराश्य येते, असे अभ्यासकांनी विषद केले आहे. 

त्यातही जास्तीतजास्त वेळ बाहेर खेळल्यास मुलांनाही फायदा होतो.  निसर्गाचा अनुभव घेत जी मुले मोठी होतात. त्यांच्यात प्रौढांपेक्षा पर्यावरणविषयक जागृती अधिक असते, असे क्विन्सलँड विद्यापीठातील  संशोधक डॅनियल शनन यांनी सांगितले. बागेत जाणे, खेळणे हे तर आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. मात्र किती वेळ व्यतीत करावा, तसेच शहरांमध्ये याबाबत कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याचे मार्गदर्शन मिळाल्यास अधिकाधिक फायदे मिळतील असे क्विन्सलँड विद्यापीठातील प्रा. रिचर्ड फुलर यांनी सांगितले. 

कशा पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात राहावे, याची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत यायला त्यासाठी जनजागृती हवी अशी अपेक्षाही फुलर यांनी व्यक्त केली. मोकळ्या जागेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात लोकांनी अधिकाधिक उपक्रम घ्यावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच हिरवाई असलेल्या ठिकाणांमध्ये त्यांनी जास्तीत जास्त वेळ व्यतीत करावा, असेही प्रबंधात सुचवण्यात आले आहे.

 या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर सायंटिफिक’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्रामुख्याने शहरी भागातील नागरिकांचे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करणे व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम विशद करण्यात आले आहेत.   

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin