Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

मानसिक आरोग्यासाठी योगासने, ध्यानधारणा आवश्यक


Main News

भारतीय वैद्यकीय शास्त्रात योगासने, ध्यानधारणा याला खूपच महत्त्व आहे. मानसिक आरोग्यासाठी नियमित योगासने, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. आता अमेरिकी शास्त्रज्ञांनीही योगासनांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जर नियमित योगासने केल्यास स्मृती टिकवून ठेवता येते, त्याशिवाय अल्झाइमर म्हणजेच स्मृतिभ्रंश या विकारावर मात करता येते, असे अमेरिकी शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

लॉस एंजलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसोपचारतज्ज्ञांच्या एका गटाने ‘योगासने आणि मानसिक आरोग्य’ यावर संशोधन केले. नियमित योगासने आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक आणि भावनात्मक समस्यांचे निराकरण होते. या समस्यांमुळेच स्मृतिभ्रंश सारखे विकार जडतात. वयोपरत्वे स्मृती कमी होत जाते. वृध्द व्यक्तीला आपल्या तरुणपणाच्या बऱ्याचशा गोष्टी आठवत नसतात. पण काही तरुणांनाही मानसिक विकारामुळे स्मृती कमी झाल्याचे जाणवते. पण जर नियमित योगासने केल्यास स्मृतीला बळकटी मिळते, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.

 केवळ स्मृतीच नव्हे, तर सर्वच मानसिक विकारांसाठी योगासने उपयुक्त आहेत. मानसिक तणाव, चिंता यांचे निराकरणही योगासनांमुळे होते, असे या शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख प्रा. हेलेन लवरेटस्की यांनी सांगितले. शास्त्रज्ञांच्या या गटाने ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २५ जणांवर प्रयोग केले. या २५ लोकांकडून नियमित योगासने आणि ध्यानधारणा करून घेण्यात आली. योगासनांनंतर त्यांच्या मानसिक आरोग्याचा आढावा घेण्यात आला. योगासने आणि ध्यानधारणेनंतर या लोकांच्या मेंदूतील स्मृतीविषयक भागात सुधारणा झाल्याचे आढळले, असे लवरेटस्की यांनी सांगितले. हे संशोधन ‘जनरल ऑफ अल्झाइमर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin