Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

नामवंत विद्यापीठांनी प्रवेश नकारलेल्या यशवंत व्यक्ती


Main News

जगातील काही यशस्वी व्यक्तींना एकेकाळी नामवंत विद्यापीठांनी प्रवेश देण्यास नकार दिला होता. पण त्यांनी स्वत:च्या हिमतीवर यशोशिखर पादाक्रांत करण्याचा पराक्रम केल्याचा इतिहासातून दिसून येते, अशाच काही यशवंत व्यक्तींचा येथे घेतलेला मागोवा....  

> वॉरन बफ्फे -  हॉर्वड बिझनेस स्कूलमधील मिळालेल्या नकारामुळे बफ्फे यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरली'. आधीच्या नकाराला न जुमानता बफ्फे कोलंबियाला गेले आणि त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. माझा प्रवेश नाकारणं ही त्यावेळची एक निर्णायक घटना होती. असे बफ्फे यांनी म्हटले आहे.

> सर्गी ब्रिन - सर्वपरिचित गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रिन यांचा पदवी शिक्षणासाठी एमआयटीमध्ये केलेला अर्ज नाकारण्यात आला होता. पुढे त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठ येथे आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिथेच त्यांची भेट लॅरी पेज यांच्याशी झाली. पुढे दोघांनी इंटरनेट विश्वात अमूलाग्र बदल घडवून आणले.  

> टॉम हँक्स - टॉम यांचा अर्ज स्वीकारणार नाहीत, याची त्यांना पूर्वकल्पना असूनही १९७४ मध्ये हँक्स यांनी एमआयटी आणि विल्लानोवाला येथे अर्ज केला होता. तिथे त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर कॅलिफॉर्नियातीत एका कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. 

> स्टीव्हन स्पीलबर्ग - सर्व यशस्वी चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक असणाऱ्या स्पीलबर्ग यांना दक्षिण कॅलिफोर्नियातील सिनेमा, कला प्रशिक्षण देणाऱ्या विद्यापीठाने दोन वेळा नाकारले होते. पण हार न मानता त्यांनी दुसऱ्या युनिव्हर्सिटीजमधून शिक्षण घेतले. 

> जॉन केरी - अनेकदा जॉन केरी यांना हॉवर्ड युनिव्हर्सिटीने नाकारलं होतं. 'रिजेक्टेड हा फारच कठीण शब्द आहे', असं केरी यांनी एक बातामी पत्रकात विनोदबुद्धीने सांगितलं होतं. केरी यांनी येल विद्यापीठातून पदवी मिळवून, पुढील शिक्षण बॉस्टन कॉलेज लॉ स्कूलमध्ये पूर्ण केलं. 

> बराक ओबामा - स्वार्टमोर कॉलेजने ओबामा यांना प्रवेश देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी कोलंबिया येथील ओसिडेन्टल कर्नल कॉलेज येथून शिक्षण पूर्ण केलं. 

> मॅट ग्रोएनिंग - सिमसन्सचा निर्माता मॅट ग्रोनिंगही हॉर्वडच्या रिजेक्टेड सदस्यांपैकी एक आहेत. एका नियतकालिकातील माहितीनुसार, वॉशिंग्टन एवर-ग्रीन स्टेट कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 

> जेरी ग्रीनफिल्ड - बेन आणि जेरीच्या या आइस्क्रीम उत्पादन करणाऱ्या कंपनीचे पार्टनर जेरी यांचा पूर्व-मध्य ओबेर्लीन कॉलेज येथून  शैक्षणिक प्रवास सुरु झाला. पण ज्यावेळी पुढील शिक्षणाकरता त्यांना वैद्यकीय शाळा कॉलेजांत अर्ज करावा लागला. त्यावेळी त्याला तब्बल २० नकारांना सामोरे जावे लागले. अखेर त्यांनी आपल्या वर्गमित्राच्या व्यवसायात पार्टनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin