Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

मोबाइल टॉवरमधील किरणोत्सारापासून मानवी जीवन सुरक्षित


Main News

मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सततच्या मोबाइलच्या वापरामुळे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतात, असे आपण आतापर्यंत समजत आलो आहोत. मात्र   मोबाइल टॉवर आणि मोबाइल यांमधून निघणाऱ्या किरणोत्साराचा मानवी जीवनावर आणि शरीरावर  कोणताही दुष्परिणाम होत नाही. या किरणोत्साराचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, अशी माहिती  केंद्रीय दूरसंपर्क मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.  

मोबाइल किंवा मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या किरणोत्सारामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात, या केवळ गैरसमज आहे. या किरणोत्सारामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजार होत असल्याची माहिती तथ्यहीन आणि निराधार आहे. याबाबतचा कोणताही शास्त्रीय पुरावा अद्याप समोर आलेला नाही. 

गेल्या ३० वर्षांपासून याविषयीचे संशोधन करणाऱ्या जागतिक आरोग्य संस्थेनेदेखील कोणतीही धोक्याची सूचना अद्याप तरी दिलेली नाही. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सहा उच्च न्यायालयांनीदेखील मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या किरोणात्सरांचा  कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

जगभरात अमेरिका, ब्रिटन, चीन आणि कोरिया या देशांमध्ये मोबाइल टॉवरची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र मोबाइल टॉवरमधील किरणोत्साराचा आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळे भारतात नेहमी याबाबत पसरणारी माहिती चुकीची आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin