Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

भरपूर हसा, आणि निरोगी रहा!


Main News

मानवी जीवन हे सध्या धावपळीचे धकाधकीचे झाले आहे. त्यातूनच ताणतणाव निर्माण होऊन त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात आणि अनेक रोगांना आमंत्रण मिळते. काही वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र हे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, खदखदून हसणं त्यावरील सहज सोपा उपाय असून ते शरीरासाठी फायद्याचे ठरते. भरपूर हसल्यामुळे निरोगी कसे ठेवता येऊ शकते, याविषयी काही टिप्स् खाली दिलेल्या आहेत.

रक्त वाहिन्यांचे कार्य सुधारते जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही तणाव स्त्राव कमी प्रेरित करता. त्यामुळे रक्त वाहिन्यांवर ताण तणावांचा कोणताही परिणाम न होता, त्या नियमित काम करतात. नकारात्मकता मर्यादेत ठेवणे. हसणं तुमच्यामध्ये सकारात्मकता घेऊन येते आणि चिंता, तणाव, राग, चिडचिड तुमच्यापासून लांब राहण्यास मदत होते. नियमित हसल्याने दडपणही कमी होते. साईड इफेक्ट नसलेला उपचार आरोग्य आणि वैद्यकीय तज्ज्ञ या गोष्टीवर विश्वास ठेवतात की, हसणं हा तुमच्या दुखण्यावर एक उत्तम उपचार आहे. 

इंडोरफिन्स तयार करते हसणं तुमच्या रक्तातील इंडोरफिन्सच्या वाढीला चालना देते. त्यामुळे तुमचा मूड आणि ताकद उत्तम राहाते. स्मरणशक्ती वाढते परीक्षेच्या आधी थोडे हसल्याने मेंदूला आराम मिळते आणि तो ताजातवाना होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार नियमित हसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणही उत्तम मिळतात. हसण्याचे फायदे अनेक असले तरी आयुष्यात कधी आणि कसे हसता येईल याचे नियोजन करून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला केव्हा हसता येईल, अशा परिस्थितीचा विचार करा. तुम्हाला हसायला भाग पडणाऱ्या लोकांमध्ये राहा. 

तुमच्या चेहऱ्यावर नकळत हास्य आणणाऱ्या विनोदी चित्रपटांना, पुस्तकांना जवळ करा. अशा ठिकाणी जा जिथे तुम्ही मोकळेपणाने हसू शकाल. पण हसत राहा. तुम्हाला आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी आठवत राहा. एखादा आवडलेला विनोद इतरांशी शेअर करा. लहान मुलांसोबत खेळा. असे एखादे चित्र तुम्ही तुमच्या बेडला लावा, की जे पाहून तुम्हाला सहज हसू येईल. तेव्हा उठा आणि मोठमोठ्याने हसण्यासाठी सज्ज व्हा. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin