Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


महेंद्रसिंग धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव


Main News

रांची, दि. ९ (पीसीबी) -  महेंद्रसिंग धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा सनसनाटी आरोप बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी केला आहे. वर्मा यांनी बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांचे नाव घेऊन हा आरोप केला आहे.

अमिताभ चौधरी हे २ जानेवारीपर्यंत झारखंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. दरम्यान, रणजी उपांत्य सामन्यात खेळण्यासाठी त्यांनी धोनीकडे आग्रह धरला होता. मात्र त्यास नकार देत धोनीने मार्गदर्शक म्हणून संघासोबत राहण्याची तयारी दर्शविली होती. या संपूर्ण घटनाक्रमामुळे धोनी व चौधरी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यातच उपांत्य सामन्यात धोनी मार्गदर्शन करत असतानाही झारखंड संघाचा गुजरातविरुद्ध पराभव झाला आणि चौधरी यांनी ही संधी साधली, असा वर्मा यांचा आरोप आहे.

चौधरी यांनी ४ जानेवारी रोजी बीसीसीआय निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसादला फोन केला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच प्रसादने धोनीला फोन करून भविष्यातील प्लानबाबत विचारणा केली. आपल्याला अशाप्रकारे विचारणा झाल्याने दुखावलेल्या धोनीने त्याचदिवशी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला, असे वर्मा यांचे म्हणणे आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin