Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


धोनीने मला संघातून बाहेर जाण्यापासून वाचवले - विराट कोहली


Main News

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) - महेंद्रसिंग धोनीच माझा कॅप्टन राहील, अशी भावूक प्रतिक्रिया देणारा टीम इंडियाचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीने धोनीने संघाला दिलेल्या आणखी एका ‘विराट’ देणगीचा उल्लेख केला आहे. धोनीने मला अनेक संधी दिल्या. मला संघातून बाहेर होण्यापासून वाचवले, असे विराटने सांगितले.

कोहलीने २००८ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत विराटचे फलंदाजीत सातत्य नव्हते. त्याचवेळी धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझे संघातील स्थान मजबूत केले. धोनी सुरुवातीच्या काळात माझा मार्गदर्शक होता. त्याने मला अनेक संधी दिल्या. माझी क्रिकेट कारकीर्द बहरण्यासाठी मला खूप वेळ दिला. मला संघातून बाहेर होण्यापासून वाचवले, असे विराटने सांगितले.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची जागा भरून काढणे सोपे नाही. धोनीविषयी तुम्ही जेव्हा विचार करता, त्यावेळी आपसूकच कर्णधार हा पहिला शब्द ओठांवर येतो. माझ्यासाठी धोनी कायम कर्णधारच राहील, असेही तो म्हणाला.

दरम्यान, धोनीने बुधवारी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवड समितीने विराट कोहली याची कर्णधारपदी निवड केली आहे. आता महेंद्रसिंग धोनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin