Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड


Main News

मुंबई, दि. ६ (पीसीबी) - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. महेंद्रसिंह धोनी यांने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने अपेक्षेनुसार विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगचे संघात पुनरागमन झाले आहे.

कसोटी मालिकेनंतर नववर्षानिमित्त मायदेशी परतलेला इंग्लंड संघ आता एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी पुन्हा भारतात येणार आहे. इंग्लंडचा संघ तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीकडे एकदिवशीय संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. तसेच स्थानिक पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगलाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सुरेश रैना आणि आशिष नेहराला टी ट्वेंटी संघात संधी मिळाली आहे.

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, महेंद्रसिंह धोनी, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव

टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin