Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


अध्यक्षपदासाठी मी पात्र नाही : गांगुली


Main News

कोलकाता, दि. ४ (पीसीबी) – बीसीसीआयच्या अध्यपदाच्या शर्यतीत माझे नाव उगाचच चर्चेत आणले गेले . या पदासाठी मी पात्र नाही. बंगालच्या  अध्यक्षपदाचा केवळ एकच वर्षाचा कार्यकाळ मी पूर्ण केला आहे, दोन वर्षे अजून शिल्लक आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षापदावरुन उचलबांगडी केली. यानंतर सौरभ गांगुलीचे नाव चर्चेत आले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयकडे हे पद स्वीकारण्यासाठी भक्कम फळी असल्याचे म्हटले .त्यांनी या पदासाठी घेतलेल्या नावांमध्ये गांगुलींच्या नावाचाही उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर गांगुलींनी आपली भूमिका स्पष्ट करुन या चर्चेला पुर्णविराम दिला.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार का, यावर गांगुली म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा आदेश मानण्याशिवाय संघटनेकडे कुठलाही निर्णय घेतला जाईल दरम्यान बीसीसीआयच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील.


 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin