Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


बीसीसीआयची सूत्रे दादाकडे; अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचे नाव चर्चेत


Main News

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवले. त्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करायची यासाठी न्यायालयाने न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नियुक्ती केली आहे. दरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सध्या आघाडीवर असल्याचे समजते. 

गांगुलीसोबतच पश्चिम झोनचे उपाध्यक्ष टी.सी.मॅथ्यू आणि गौतम रॉय देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. याशिवाय, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव ब्रिजेश पटेल यांचे नाव देखील चर्चेत आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमांनुसार अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली पात्र ठरू शकतो. गांगुली स्वत: माजी क्रिकेटपटू असल्याने त्याची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. गांगुलची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर तो बीसीसीआयचा ३८ वा अध्यक्ष ठरणार आहे.

झारखंड क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आणि बीसीसीआयचे सध्याचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी हे अजय शिर्के यांची जागा घेऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी  न्यायमित्र न्यायालयात कोणती नावे सुचवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना न्यायालयात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin