Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


पी. व्ही. सिंधूला मिळणार एक हजार चौरस यार्ड जमीन


Main News

हैदराबाद, दि. ३ (पीसीबी) - रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याची बक्षिसी म्हणून तेलंगणा सरकारने भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला १००० स्क्वेअर यार्ड जमीन देऊ केली आहे आणि सोमवारी तसा सरकारी आदेशही निघाला. हैदराबाद जिल्ह्यातील शेकपेट गावात ही जमीन देण्यात आली आहे.

या सरकारी आदेशात म्हटले आहे की, सरकारने पूर्ण अभ्यासाअंती हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यानुसार शेकपेट गावालगतचे जमिनीचे दोन तुकडे ज्यांचा आकार १००० स्क्वेअर यार्ड आहे, तो बॅडमिंटनपटू सिंधूला प्रदान करण्यात येत आहे. सरकारकडून शाबासकी म्हणून सिंधूला ही जमीन देण्यात येत आहे.

सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरण्याचा मान मिळविला. या पराक्रमाबद्दल तिला तेलंगणा सरकारने ५ कोटींचे बक्षिस दिले तसेच जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता पूर्ण करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin