Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


बीसीसीआयच्या स्वायत्ततेसाठी मी लढा दिला - अनुराग ठाकूर


Main News

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) - देशाचा नागरिक म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मला पूर्णपणे मान्य आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी आजवर कोणतीही वैयक्तिक लढाई केलेली नाही. संघटनेच्या स्वायत्ततेसाठी मी लढा देत आलो आहे, अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली. 

न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवले. या निर्णयानंतर अनुराग ठाकूर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. 

बीसीसीआय देशातील सर्वोत्तम क्रीडा संघटना असून जगाशी तुलना करता भारतात क्रिकेटच्या खूप चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. बीसीसीआयच्या मदतीने स्थानिक क्रीडा संघटना खूप चांगले काम करत आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयचा कारभार यापेक्षाही अधिक चांगला होत असेल, तर  त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. भारतीय क्रिकेट त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करेल. भारतीय क्रिकेट खेळाप्रतीची माझी बांधिलकी यापुढेही कायम राहिल, असेही अनुराग ठाकूर म्हणाले.

लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली. शिवाय, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी कायदेतज्ज्ञ फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी येत्या १९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin