Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर, अजय शिर्के यांना पदावरून हटवले


Main News

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) - लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास नकार देणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून हटवले आहे. आज (सोमवारी) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यामुळे  बीसीसीआयला धक्का बसला आहे. 

आदेशांचे पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच न्यायालयासमोर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस ठाकूर आणि शिर्के यांना देण्यात आली आहे. मागील वर्षी १८ जुलै रोजी न्यायालयाने  दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

दरम्यान लोढा समितीने १४ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी आपला तिसरा अहवाल सादर केला होता. लोढा समितीच्या ठाम भूमिकेनंतर न्यायालयानेही आपला आदेश कायम ठेवला होता. तसेच बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या वारंवार सुचनेनंतरही बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्यास नकार देत होते. त्यामुळे अखेर आज न्यायालयाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटवले आहे. 

दरम्यान बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांसाठी नाव सुचविण्याचेही न्यायालयाने मागील सुनावणीत म्हटले होते. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin