Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


आम्ही साखरपुडा करत नाही आहोत – विराट कोहली


Main News

नवी दिल्ली , दि.३० (पीसीबी) – टीम इंडियाचा स्टार कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड तारका अनुष्का शर्मा नववर्षाच्या पहिल्या दिवशी साखरपुडा करणार असल्याच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे, या संदर्भात प्रसारमाध्यमांवर सुरु असलेल्या बातम्यांचा विराट कोहलीनचं ट्विटरवरुन समाचार घेतला आहे आणि सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे.

आम्ही साखरपुडा करत नाही आहोत जर साखरपुडा करायचा असता तर लपवला नसता अस ट्विट विराट कोहलीन केलं आहे. अफवा पसरवून तुम्हाला संभ्रमात टाकण्याच काम वृत्तवाहिन्या करत आहेत, आम्ही हा गोंधळ संपवतोय असा टोलाही त्यान लगावला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २४ डिसेंबरला उत्तराखंडमध्ये पोहोचले होते आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी थेट स्पा रिसार्टला गेले होते. त्यानंतर येत्या १ जानेवारीला हे दोघ साखरपुडा करणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आदी दिग्गजही उत्तराखंड पोहोचल्याचं बोललं जात होतं परंतु या साखरपुड्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ पुड्या असल्याचं विराटनं स्पष्ट केलंय.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin