Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली


Main News

मेलबर्न, दि. २७ (पीसीबी) - भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने २०१६ च्या वन-डे संघाची घोषणा केली असून कर्णधार म्हणून भारताच्या विराट कोहलीला पसंती दिली आहे. याआधी आयसीसीने सुद्धा 'वन-डे टीम ऑफ द इअर'साठी विराट कोहलीची कर्णधार म्हणून निवड केलेली आहे.

२०१७ मध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया संघाचा वन-डेचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने म्हटले होते की, भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघ विराटला लक्ष्य करून त्याची एकाग्रता तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१६ च्या वन-डे संघाचा कर्णधार म्हणून स्मिथला बाजुला सारून विराटची कर्णधार म्हणून निवड केल्याने स्मिथची एकाग्रता भंग झाली आहे.

१० वन-डे सामन्यात विराटने ८ वेळा ४५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताने विराटच्या उपस्थितीत ५९ वेळा यशस्वी धावसंख्येचा पाठलाग केला. यावेळी विराटने ९०.१० च्या सरासरीने धावा केल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटने म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा 'वन डे टीम ऑफ द ईअर' पुढीलप्रमाणेः विराट कोहली (भारत, कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक, दक्षिण आफ्रिका), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), बाबर आजम (पाकिस्तान), मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया), जोस बटलर (इंग्लंड), जसप्रित बुमराह (भारत), इमरान ताहिर (दक्षिण आफ्रिका).

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin