Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


भारतीय क्रिकेटसाठी संस्मरणीय ठरले वर्ष २०१६; एक नजर या वर्षीच्या कामगिरीवर


Main News

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) - यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले.क्रीकेट मधील प्रत्येक प्रकारात आपली संघाने आपली छाप सोडत अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.वर्षभरात संघाने काय कामगिरी केली याची सर्वानाच उत्सुकता आहे.जाणुन घेऊयात वर्ष २०१६ मधील यश आणि खेळाडुंच्या वैयक्तिक प्रदर्शनाबाबत.

अशिया चषक यंदाच्या वर्ष ६ मार्च रोजी मीरपूर येथे भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान टी -२०चा अंतीम सामना झाला. यात यजमान बांगलादेशचा टीम इंडियाने ८ विकटने पराभाव करुन अशीया चषकावर आपले नाव कोरले. १९ वर्षाखालील अशीया चषकःभारताने १९ वर्षाखालील संघाने २०१६ या वर्षाचा शेवट गोड करत सलग तीसऱ्यांदा अशीया चषकावर  आपले नाव कोरले आहे.श्रीलंकेटची राजधानी कोलंबो येथे खेळण्यात आलेल्या अंतीम सामन्यात भारतीय संघाने यजमान श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली.भारताने सलग  तिसऱ्यादा हा किताब  पटकावुन अंतरायष्ट्रीय पातळीवर  देशाचे नाव झळकवले.या पुर्वी वर्ष २०१२,२०१४ या वर्षी विजय मीळवला होता.

महिला अशिया चषक गत ४ डिसेंबर रोजी बॅंकाक येथे खेळण्यात आलेल्या अंतीम सामन्यात भारतीय  महीला संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी  पाकीस्तानला १७ धावांनी पराभव करत अशिया कप आपल्या नावे केला होता. भारताने सलग सहाव्यांदा या चषकावर नाव कोरले होते.प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची कर्णधार मीताली राजने ७३ धावांची खेळी करत पाकसमोर१२२ धावांचे लक्ष ठेवले होते.पाकिस्थानची  संपूर्ण् टीम १०४ धावात संपुष्टात आली होती. १९ वर्षाखालील विश्वचषक बांगलादेशमध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्व्चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे ईशान किसन यांच्या नेत़ृत्वाखाली महीपाल लोमरोर आणि ऋषभ पंत यांनी सर्वाचे लक्ष वेधले. अंतिम फेरीत त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला.

आयसीसी टी -२०विश्वचषक या वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत टी -२० विश्वचषक  स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने उंपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. उपांत्य फेरीत वेस्ट इंडीजने इंग्लडचा चार विकेटने पराभव करत चषक आपल्या नावे केला. या मालिकेचा हीरो टीम इंडीयाचा विराट कोहली ठरला.त्याला मालीकावीराचा पुरस्कार देण्यात आला. करुण नायरचे  त्रिशतक –भारत आणि इंग्लंड  यांच्या  दरम्यान चेन्नई येथे खेळण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहील्या डावात करुण नायरने नाबाद ३०३ धावांची खेळी केली.करुनने आपल्या कारकीर्दीतील तीसऱ्या कसोटीच शतक केले आहे.विरेंद्र् सेहवाग नंतर त्रिशतक करणारा  करुण नायर भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

इंग्लड न्युझीलंडला चारली पराभावाची धूळःयंदा टीम इंडियाने कसोटी सामन्यांत  चमकदार  कामगीरी करत प्रथम  न्युझीलंडला ३-० त्यानंतर इंग्लडला ४-० अशा फरकाने  पराभूत केले.विराट कोहलीच्या  नेतृत्वाखाली टीम इंडीयाने सलग १८ कसोटीत  विजयी होण्याचा  विक्रम बनवला आहे. आर .अश्विन – टीम इंडीयाला आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी  पोहचवण्यात रवीचंद्रन अश्वीनने वर्ष् २०१६ मघ्ये १२ सामन्यात ७२ गडी बाद केले. या दरम्यान ८ वेळा डावात ५ बळी आणि ३ वेळा १० हुन अधीक बळी घेण्याचा कारनामा केला आहे.अश्वीन यंदा सर्वाधीक  बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरबर त्याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये  सर्वाधीक वेगाने २०० बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.अश्वीनला त्यांच्या कामगीरीमुळे  आयसीसीने वर्षातील सर्वश्रेष्ठ  क्रिकेटपटु आणि कसोटी क्रिकेटर ऑफ द इअर  हा किताब जाहीर केला

विराट कोहली –विराट कोहलीने वर्ष २०१६ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात  भारतासाठी धावाचा पाऊस पाडला  एकदिवसीय आणि टी २० प्रमानणेच त्याने कसोटीतही विरोधी  संघाचा धुव्वा उडवला.विराटने या वर्षी कसोटीमध्ये सुमारे ८० च्या सरासरीने १२१५ धावा बनवल्या याच दरम्यान त्याने ३ द्विशतके ही ठोकले . विशेष  म्हणजे या पुर्वी विराट कोहलीने प्र्थमश्रेणी साममन्यात एकही द्विशतक केलेले नाही.Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin