Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


विराट कोहली ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी


Main News

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) - गुरूवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वार्षिक पुरस्कारांच्या घोषणेसोबतच सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली. आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीला स्थान देण्यात आलेले नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम संघात विराट कोहलीची थेट कर्णधार म्हणून निवड केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ याला संघात स्थान दिले असले तरी डेव्हिड वॉर्नरचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. विराट कोहलीसह भारताच्या अष्टपैलू आर. अश्विनचा देखील संघात समावेश आहे.

 

आयसीसीने गुरूवारी जाहीर केलेला सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघ हा खेळाडूंनी १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेड बोर्डाने यंदाच्या वर्षात जानेवारी ते डिसेंबरमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड केली आहे.

 

दरम्यान, आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताचा फिरकीपटू आर. अश्विन अद्वितीय ठरला. वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी खेळाडू असे दोन्ही पुरस्कार अश्विनने यावेळी पटकावले. द वॉलअशी बिरुदावली मिरवणारा माजी क्रिकेकपटू राहुल द्रविडने २००४ साली हे दोन्ही पुरस्कार मिळवले होते. सर गॅरी सोबर्स यांच्या नावाने दिला जाणाऱ्या चषकाचा तो तिसरा भारतीय मानकरी ठरला. २००४ द्रविड आणि २०१० साली भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता. अश्विन १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या वर्षभरात आठ कसोटी सामने खेळला. या आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४८ बळी मिळवत ३३६ धावाही केल्या. या वर्षांतील १९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याने २७ बळी मिळवले आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin