Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


सध्याचे वातावरण क्रिकेटपटूंसाठी हिताचे नाही - अनुराग ठाकूर


Main News

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ज्या संकाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहता सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नसल्याचे विधान बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय बीसीसीआयसमोर नसल्याचेही ते शुक्रवारी म्हणाले. येत्या ३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे.

 

एका कुस्ती लीगच्या प्रमोशनल कार्यक्रमात अनुराग ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाले की, सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नसल्याची कल्पना आम्हाला आहे, पण प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निकाल येईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. बीसीसीआय सध्या संकटाशी सामना करत आहे आणि ३ जानेवारीपर्यंतच्या सुनावणीपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे.

 

 

सुप्रीम कोर्टाने लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश बीसीसीआयला दिले आहेत. मात्र, बीसीसीआयने शिफारशी मान्य करण्यास पूर्णपणे विराध केला आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या स्थितीवर टीका करणाऱया माजी क्रिकेटपटूंनाही ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. बीसीसीआयने सरकारकडून दमडीही न घेता स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. तरीसुद्धा काही माजी क्रिकेटपटू बीसीसीआयविरोधात बोलतात, असे ठाकूर म्हणाले.

 

बीसीसीआयजवळ पैसा असूनही तो खर्च करता येत नसल्याबद्दलही ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. आयसीसीच्या सभेत देखील प्रत्येकाने बीसीसीआयच्या अस्तित्वाचे महत्त्व मान्य केले आहे. सभेत प्रत्येकाने बीसीसीआयची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. जर बीसीसीआयशिवाय काम होऊ शकेल, असे कुणाचे मत असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बीसीसीआयचे महत्त्व मान्य करण्यात आल्याची गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, असेही ठाकूर पुढे म्हणाले. आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि कसोटीपटूचा पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या भारताचा फिरकीपटू आर. अश्विनचेही ठाकूर यांनी कौतुक केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin