Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


'क्रिकेटर ऑफ द इअर' पुरस्कारासाठी रविचंद्रन अश्विनची निवड


Main News

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी)  - कसोटी सामन्यांमध्ये आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा भारताचा अव्वल गोलंदाज रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या 'क्रिकेटर ऑफ द इअर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राहुल द्रविड (२००४) आणि सचिन तेंडुलकर (२०१०) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारा अश्विन तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 
 
यावर्षी अश्विनने १२ कसोटी सामन्यांमध्ये ७२ विकेट मिळवल्या. त्यासाठी अश्विनला 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर'चाही पुरस्कार मिळाला आहे. इथेही राहुल द्रविड (२००४) आणि गौतम गंभीर (२००९) यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमधला हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा अश्विन भारताचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. 
 
 भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताकडून ४-० असा मानहानीकारक पराभव होऊनही इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलिस्टर कूकला आयसीसीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले आहे. तिसऱ्यांदा कूकची आयसीसीच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin