Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


भारताचा इंग्लंडला ४-० असा व्हाईटवॉश; विराट कोहली मालिकावीर


Main News

चेन्नई, दि. २० (पीसीबी) - चेन्नई कसोटी भारतीय संघाने तब्बल १ डाव आणि ७५ धावांनी जिंकली. भारताने पाच कसोटींच्या मालिकेत इंग्लंडला ४-० असा व्हाईटवॉश दिला. भारताने मिळवलेल्या २८२ धावांच्या आघाडीचा आकडा देखील इंग्लंडला गाठता आलेला नाही. रवींद्र जडेजाने ७ बळी घेऊन इंग्लंडला अवघ्या २०७ धावांत गुंडाळले.  त्रिशतकी खेळी साकारणारा करुण नायर सामनावीर ठरला, तर संपूर्ण मालिकेत ६५५ धावा चोपणारा कर्णधार विराट कोहली मालिकावीराचा मानकरी ठरला.

पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात उपहारापर्यंत भारताला एकही यश मिळवता आले नव्हते. त्यामुळे इंग्लंडला ‘व्हाईटवॉश’ देण्याचे स्वप्न अधुरे राहणार अशी चिंता निर्माण झाली होती, पण दुसऱ्या सत्रात जडेजाने अॅलिस्टर कुक आणि जेनिंग्सची शतकी भागीदारी फोडली. जडेजाने अॅलिस्टर कुक याला ४९ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जेनिंग्ज देखील ५४ धावांवर जडेजाच्याच फिरकीवर झेलबाद होऊन माघारी परतला. पुढे जडेजाने जो रुटला बाद करून संघाला तिसरे यश मिळवून दिले. जडेजाने डीप मिड विकेटच्या दिशेने धावत बेअरस्टोचा झेल टीपला आणि इंग्लंडला चौथा धक्का बसला.

जो रुटनंतर मोईन अली जडेजाच्या फिरकीवर मोठा फटका मारताना झेलबाद झाला. तर बेन स्टोक्सला(२३) जडेजाने माघारी धाडले. मग अमित मिश्राने आपली फिरकी जादू दाखवत इंग्लंडच्या डॉसन याला क्लीनबोल्ड करुन शून्यावर बाद केले . भारताने आक्रमक क्षेत्ररक्षणक करत इंग्लंडवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले आणि पुढील दोन्ही विकेट्स जडेजाने आपल्या खात्यात जमा करत इंग्लंडवर ऐतिहासिक विजय प्राप्त केला.

दरम्यान कसोटीचा चौथा दिवस भारताच्या करुण नायरने गाजवला होता. कर्नाटकच्या या युवा खेळाडूने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले त्रिशतक झळकावले. नायरच्या अफलातून खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडसमोर  ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारता आला. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin