Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


भारताची ऐतिहासिक कामगिरी; ज्युनिअर हॉकीचा विश्वचषक पटकावला


Main News

लखनौ, दि. १८ (पीसीबी) - भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २ – १ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारतीय संघाने विश्वचषक पटकावला होता. तब्बल १५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला.

देशवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत दिमाखात सुरुवात झाली. भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून बेल्जियमच्या संघाला डोके वर काढू दिले नाही. पहिल्याच डावाच्या सुरुवातीला गुरजंत सिंगने सातव्या मिनिटालाच पहिला गोल डागला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने सिमरनजितने दुसरा गोल डागून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावाचा खेळ सुरू झाला. मात्र, भारतीय संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखले. बेल्जियमच्या खेळाडूंना आक्रमणाची संधीच दिली नाही. अखेरचे ४० सेकंद शिल्लक असताना बेल्जियमने गोल केला. मात्र, तोपर्यंत त्यांच्या हातून सामना निसटला होता.
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin