Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


चेन्नई कसोटी; तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या ४ बाद ३९१ धावा


Main News

चेन्नई, दि. १८ (पीसीबी) -  भारताने चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या ४७७ धावांना प्रत्युत्तर देताना तिसऱ्या दिवसअखेर  ४ बाद ३९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप ८६ धावांनी पिछाडीवर असून,  खेळ संपला तेव्हा करुण नायर ७१ आणि मुरली विजय १७ धावांवर नाबाद आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला तो लोकेश राहुलने. चौफेर फटकेबाजी करणाऱ्या राहुलने आज आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडला झोडपून काढले. दरम्यान, राहुलने पार्थिव पटेलच्या साथीने १५२ आणि करुण नायरच्या साथीने १६१ धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. मात्र सामन्याच्या शेवटच्या सत्रात जबरदस्त फटकेबाजी करत द्विशतकाकडे कूच करणाऱ्या राहुलचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले.  

आज खेळाला सुरुवात झाल्यावर पार्थिव पटेल (७१) आणि लोकेश राहुलने केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने  उपाहाराला १ बाद १७३ अशी मजल मारली होती. 

मात्र उपाहारानंतर भारतीय संघाने चेतेश्वर पुजारा (१६) आणि कर्णधार विराट कोहली (१५) यांच्या रूपात दोन गडी गमावले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या राहुलने आपले शतक साजरे केले. राहुलचे हे कसोटी क्रिकेटमधील चौथे शतक आहे. राहुलने करुण नायरला साथीस घेत चहापानापर्यंत भारताला ३ बाद २५६ अशी मजल मारून दिली होती. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin