Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


क्रिकेट कधीच भ्रष्टाचारमुक्त होऊ शकत नाही


Main News


इस्लामाबाद, दि. १७ (पीसीबी) - सामना निश्चितीप्रकरणी दोषी ठरलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट याने क्रिकेट केव्हाच भ्रष्टाचारमुक्त होणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. पण त्यासोबतच क्रिकेटला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा देखील सलमानने यावेळी केली. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सलमान बट्टने सामना निश्चिती आणि क्रिकेटमधील भ्रष्टाचारावर भाष्य केले. तो म्हणाला की, मी क्रिकेटमधील भ्रष्टाचार अगदी जवळून पाहिला आहे. क्रिकेट संपूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त होणे अशक्य आहे. कारण अशा प्रकरणात अडकण्यासाठी केवळ एका छोट्याशा क्षणाची गरज असते आणि चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही भ्रष्टाचारामुळे उद्ध्वस्त होता. पण २०१० साली आम्ही स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाला बळी पडल्यानंतर आयसीसीकडून फिक्सिंगला आळा घालण्यासाठी उत्तम प्रयत्न सुरू करण्यात आले. खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन शिबीरे घेण्यात आली. त्यामुळे क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केली गेलेले प्रयत्न नक्कीच चांगले आहेत, असेही सलमान बट्ट म्हणाला.

पाकिस्तानने २०१० मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. त्या वेळी मॅचफिक्सिंग व स्पॉटफिक्सिंगमधील सहभागाच्या आरोपाखाली बट्ट याच्याबरोबर महंमद असिफ व महंमद अमीर यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीसीने पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. तसेच त्यांना इंग्लंडमधील न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगवासही झाला होता. सप्टेंबर २०१५ मध्ये सलमान बट्टवरील बंदी संपुष्टात आली.

मला माझे आयुष्य आणि करिअर नव्याने सुरू करण्याची दुसरी संधी मिळाली याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे. सहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडलेला प्रसंग खूप वाईट होता. पण माझ्या मनात क्रिकेट खेळण्याची तीव्र इच्छा आणि सच्चा भाव असल्याने माझे करिअर नव्याने सुरू करण्याची संधी मिळाल्याचेही सलमान बट्ट म्हणाला.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin