Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


इंग्लंड सर्वबाद ४७७ धावा; भारताच्या नाबाद ६० धावा


Main News

चेन्नई, दि. १७ (पीसीबी) - इंग्लंड संघाचा पहिला डाव ४७७ धावात संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाने सावध सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवस अखेरीस  भारताने नाबाद ६० धावा केल्या. के एल राहुल आणि पार्थिव पटेलने संयमी खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. भारत अजून ४१७ धावांनी मागे आहे. के एल राहुल ३० तर पार्थिव पटेल २९ धावांवर नाबाद आहेत. 
 
मोईन अलीच्या १४६ धावांच्या शतकी खेळीनंतर डॉसन नाबाद (६६) आणि अब्दुल राशिदच्या (६०) धावांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या. दुसऱ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडने आणखी १९३ धावांची भर घातली. खेळाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सत्रात भारताने इंग्लंडचे तीन फलंदाज ३७ धावात तंबूत पाठवून इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले होते. पण डॉसन आणि अब्दुल राशिदने आठव्या विकेटसाठी १०८  धावांची भागीदारी करुन इंग्लंडला सुस्थितीत पोहोचवले.
 
चेपॉक स्टेडियमवर भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तडाखेबाज खेळी करणाऱ्या मोइन अलीचे दीडशतक अवघ्या ४ धावांनी हुकले. १४६ धावांवर खेळणारा मोइन उमेश यादवच्या गोलंदाजीवर जडेजाकडे झेल देऊन बाद झाला.  ४ बाद २८४ वरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करणाऱ्या इंग्लंडला सुरूवातीलाच स्टोक्सच्या रुपाने ५ वा धक्का बसला. अश्विनने स्टोक्सला ६ धावांवर तर इशांत शर्माने बटलरला ५ धावांवर बाद केले.
 
त्यानंतर मोइन अलीने डॉसनच्या साथीने खेळ पुढे नेला. मात्र १४६ धावांवर तो बाद झाला. काल मोईन-ज्यो रुट यांच्यात झालेली १४६ धावांची भागीदारी दिवसाच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले होते. भारतातर्फे आत्तापर्यंत जडेजाने ३, इशांत शर्माने २ तर अश्विन आणि यादवने प्रत्येकी १ बळी टिपला. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin