Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


'एमसीए'च्या अध्यक्षपदावरून शरद पवार पायउतार होणार ?


Main News

मुंबई, दि. १७ (पीसीबी) - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापन समितीची शनिवारी तातडीची बैठक होणार असून लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी स्विकारायच्या की नाही? याबाबत चर्चा केली जाणार आहे. एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी ७० वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा आणि एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन टर्मसाठी पदाधिकारी होता येणार नाही, अशी शिफारस लोढा समितीने दिलेल्या अहवालात आहे. त्यामुळे एमसीएने लोढा समितीच्या तरतुदी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार अध्यक्षपदासाठी अपात्र ठरतील आणि त्यांना पायउतार व्हावे लागेल. पवार यांचे वय ७६ वर्ष असून ते याआधी दोनवेळा त्यांनी एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.

दरम्यान,  पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. त्यांना न्यायालयाचे  निर्णय डावलून कोणतीही भूमिका बजावण्याची इच्छा नाही. शरद पवार यांनी शुक्रवारी एफआयसीसीआयच्या ८९ व्या वार्षिक सभेत बोलताना, आता क्रिकेट कसे खेळायचे हे देखील न्यायालय ठरवणार. याआधी देश कसा चालवायचे हे न्यायालय सांगत होते, आता क्रिडा संघटना कशा चालवायचे हे देखील न्यायालय सांगणार? याविषयावर मला काहीच बोलाचये नाही, अशी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin