Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


भारत ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत


Main News

लखनौ, दि. १७ (पीसीबी) - भारताने ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लखनौमध्ये झालेल्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर शूटआऊटमध्ये ४-२ अशी मात करुन अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आता अंतिम सामन्यात भारत आणि बेल्जियम यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.

या सामन्यात टॉम क्रेगने १४ व्या मिनिटाला गोल करुन ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले होते. पण गुरजंतसिंगने ४२ व्या आणि मनदीप सिंगने ४८ व्या मिनिटाला गोल झळकावून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

मात्र लॅकलान शार्पने ५७ व्या मिनिटाला गोल डागून ऑस्ट्रेलियाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. मग शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू बर्ड आणि लॅकलान शार्पने गोल करण्याची संधी दवडली. त्यामुळे भारताला ४-२ असा विजय मिळवणे शक्य झाले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin