Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


चेन्नई कसोटी जिंकल्यास भारताच्या नावावर होणार सर्वात मोठा विक्रम


Main News

चेन्नई, दि. १६ (पीसीबी) - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ३-० अशी विजयी आघाडी मिळवल्यानंतर चेन्नई कसोटी जिंकून भारतीय संघाला नव्या विक्रमाची नोंद करण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई कसोटीत देखील आपला विजयी रथ कायम राखून इंग्लंडविरुद्ध ४-० असा मोठा विजय प्राप्त करण्याचा भारतीय संघ नवा विक्रम करू शकणार आहे.

याआधी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४-० असा विजय मिळवता आला नव्हता. १९९२-९३ मध्ये भारताने मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. त्यानंतर आता कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला इंग्लंडवर ४-० असा मोठा विजय प्राप्त करण्याची संधी असणार आहे. याशिवाय, २०११मध्ये इंग्लंडमध्ये भारताने ०-४ अशा फरकाने सपाटून मार खाल्ला होता. त्या पराभवाचे उट्टे सव्याज फेडता येतील.

कसोटी विश्वात भारत आणि इंग्लंड दरम्यान ११६ सामने खेळवले गेले असून यात भारतीय संघाला एकदाही इंग्लंडवर ४-० अशी मात करता आलेली नाही. विशेष म्हणजे, चेन्नईच्या स्टेडियमवर गेल्या १६ वर्षात भारतीय संघाच्या वाट्याला पराभव आलेला नाही. त्यामुळे विजयाची आकडेवारी देखील भारताच्या बाजूने आहे. त्यात भारताने ही मालिका याआधीच ३-० अशी जिंकली असल्याने इंग्लंडवर दबाव असेल. चेन्नई भारतीय संघाचे पारडे जड आहे. चेन्नईतील विजयानिशी भारत सलग १८ व्या कसोटी सामन्यात अपराजित राहण्याची देखील किमया साधू शकेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin