Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


चेन्नई कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय


Main News

चेन्नई, दि. १६ (पीसीबी) - भारत आणि इंग्लंडमधील शेवटच्या कसोटीत इंग्लंडने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने मुंबईची कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजपासून (शुक्रवार) चेन्नईत पाचवी आणि अखेरची कसोटी खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम कसोटी जिंकून इंग्लंडवर ४-० असा विजय साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.

दुखापतीमुळे अष्टपैलू जयंत यादव संघातून बाहेर आहे. त्याऐवजी अमित मिश्राचा समावेश करण्यात आला आहे भुवनेश्वर कुमारऐवजी इशांत शर्माचा पहिल्या अकरामध्ये समावेश झाला आहे. भारताच्या संघात विराट कोहली (कर्णधार) मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, के नायर, आर. अश्विन, पार्थिव पटेल, रविंद्र जाडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, इशांत शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे

 कसोटी क्रिकेटच्या ८४ वर्षांच्या इतिहासात भारताने आजवर इंग्लंडला ४-० इतक्या मोठ्या फरकाने कधीच हरवलेले नाही. १९३२ पासून भारतीय संघ आजवर १५१ कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. पण त्यात भारताला केवळ एकदाच ४-० असा विजय साजरा करता आला आहे. २०१३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० असे हरवले होते. आता विराटची टीम इंग्लंडला ४-० अशा फरकाने हरवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin