Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


चेन्नई कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का; जेम्स अँडरसन संघाबाहेर


Main News

चेन्नई, दि. १५ (पीसीबी) - भारताविरुद्धची कसोटी मालिका याआधीच ३-० अशी गमावली असताना चेन्नईत होणाऱ्या पाचव्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या जेम्स अँडरसन याला दुखापतीमुळे चेन्नई कसोटीला मुकावे लागणार आहे. जेम्स अँडरसन याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो चेन्नई कसोटी खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याने याबद्दलची माहिती दिली आहे.

चेन्नईत चेपॉकच्या खेळपट्टीवर शुक्रवारपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. इंग्लंडचा ४-० असा व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून इंग्लंडच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा शिलेदार दुखापतीने माघारी फिरल्याने इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. अँडरसन गेल्या आठवड्याभरापासून कोहलीवरील टीकेमुळे देखील चर्चेचा विषय ठरला आहे. 

अँडरसनने मुंबई कसोटीत द्वीशतक झळकावणाऱ्या भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर टीका केली होती. भारतीय वातावरणाचा पुरेपूर फायदा उचलत विराट कोहली धावांची शिखरे उभारतो आहे, असे विधान जेम्स अँडरसन याने केले होते. जेम्स अँडरसनवर भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी प्रशिक्षक मदनलाल आणि पाकिस्तानच्या निवड समितीचे प्रमुख इन्झमाम उल हक यांनी कडक शब्दांत टीका केली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin