Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


खोटी साक्ष दिल्यास अनुराग ठाकूर यांना तुरुंगवास - सर्वोच्च न्यायालय


Main News

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. दरम्यान अनुराग ठाकूर यांनी खोटी साक्ष दिल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल, अशा शब्दात न्यायालयाने ठाकूर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.  त्यामुळे आजच्या निर्णयामुळे अनुराग ठाकूर अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीसीसीआय’चे अध्यक्ष म्हणून आपण शशांक मनोहर यांचा सल्ला घेतल्याची अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात शपथपूर्वक खोटी माहिती दिल्याचे न्यायमित्रांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले आहे. याशिवाय, अनुराग ठाकूर यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवावा, अशी मागणी देखील केली. त्यावर न्यायालयाने कडक शब्दांत ठाकूर यांना फटकारले असून वांरवार कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी खोटी साक्ष नोंदविल्याचे सिद्ध झाल्यास ठाकूर यांना तुरुंगवास भोगावा लागेल, असे सांगितले.

दरम्यान या प्रकरणी न्यायालयाचा अंतिम आदेश दोन किंवा तीन जानेवारीला येऊ शकतो. न्यायालयाने ‘बीसीसीआय’ला प्रशासकीय पॅनेलसाठी नावे सुचवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिला आहे. न्यायमित्रांनी त्यासाठी गृहविभागाचे माजी सचिव जी. के. पिल्ले, माजी कसोटीवीर मोहिंदर अमरनाथ आणि कॅगचे प्रतिनिधी विनोद राय यांची नावे सुचवली आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin