Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


मुंबई कसोटीसह मालिका भारताने जिंकली; इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव


Main News

मुंबई, दि.१२ (पीसीबी) - फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या १२ बळींच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट विजय मिळवला आहे. एक डाव आणि ३६ धावांनी इंग्लंडला धूळ चारून भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. या मालिका विजयामुळे भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे.

एका वर्षात तीन कसोटी द्विशतके झळकावणारा विराट कोहली 'सामनावीर' ठरला असून एका डावात पाच विकेट घेण्याची किमया २४व्यांदा करून अश्विनने कपिल देवला मागे टाकले आहे.

पहिल्या डावात ४०० धावांचा डोंगर रचणाऱ्या 'कूक कंपनी'ला दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी १९५ धावांत गुंडाळले. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो वगळता इंग्लंडचा एकही शिलेदार पीचवर फार काळ टिकू शकला नाही. किंबहुना, अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांनी त्यांना 'सेट' होण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे पहिल्या डावातील २३१ धावांची आघाडीच टीम इंडियाला विजयासाठी पुरेशी ठरली. पहिल्या डावात ४००चा टप्पा गाठूनही एका डावाने पराभूत होण्याचा बाका प्रसंग इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढवला.

भारताने पहिल्या डावात ६३१ धावा केल्या होत्या. हा आकडा पाहूनच बहुधा इंग्लंडची गाळण उडाली होती. म्हणूनच, दुसऱ्या डावात ते पार गडगडले. काल, चौथ्या दिवसअखेर त्यांची अवस्था ६ बाद १८२ अशी होती. त्यामुळे भारताचा विजय निश्चितच होता. त्यावर, अश्विनने आज पाऊण तासात शिक्कामोर्तब केले. काल ५० धावांवर नाबाद असलेला बेअरस्टो किती काळ तग धरणार, यावर भारताचा विजय किती लांबणार हे ठरणार होते. परंतु, अश्विनने त्याला तिसऱ्याच ओव्हरमध्ये माघारी धाडले. 

इंग्लंडच्या एकूण २० विकेटपैकी १९ विकेट घेऊन भारताच्या फिरकीपटूंनी आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin