Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


इंग्लंडच्या ६ बाद १८२ धावा; भारताची विजयाकडे आगेकूच


Main News

मुंबई, दि. ११(पीसीबी) - मुंबई कसोटीत पहिल्या डावात भारताने घेतलेली २३१ धावांची आघाडी निर्णायक ठरताना दिसत आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १८२ धावांवर ६ गडी बाद अशी इंग्लंडची अवस्था असून डावाने पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला अजूनही ४९ धावांची आवश्यकता आहे. 

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्या डावाचा शतकवीर कीटन जेनिंग्सला (०) भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात भोपळाही फोडू न देता बाद करून इंग्लंडला बॅकफूटवर धाडले.  त्यानंतर भारताच्या फिरकी त्रिकुटाने सुत्रे आपल्या हाती घेतली आणि फिरकीच्या तालावर इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवले.  

इंग्लंडकडून जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. रूटने ७७ धावांची झुंजार खेळी केली मात्र, जयंत यादवने त्याला पायचीत केले. तर बेअरस्टो ५० धावांवर नाबाद आहे.  इंग्लंडचा कर्णधार कूकला १८ धावांवर असताना जाडेजाने पायचीत पकडले तर, मोईन अलीला जाडेजाने खातेही खोलू न देता मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. बेन स्टोक्सला अश्विनने १८ धावांवर विजयकरवी झेलबाद केले. तर अखेरच्या षटकात अश्विनने जे.टी.बॉल(२)याला बाद करत यष्टिरक्षक पार्थिव पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin