Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


विराटचे द्विशतक; भारत पहिल्या डावात आघाडीच्या दिशेने


Main News

मुंबई, दि.११(पीसीबी) - पाहुण्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेल्या विराट कोहलीने भारत आणि इंग्लंडमध्ये मुंबईत सुरू  असलेल्या चौथ्या कसोटीत आज करत द्विशतक साजरे केले. तिसऱ्या दिवशी १४७ धावांवर नाबाद असलेल्या कोहलीने आज सकाळपासून गोलंदाजांची धुलाई करत द्विशतक फटकावले. विराटचे या वर्षातील आणि कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे द्विशतक ठरले आहे. या खेळीदरम्यान विराटने जयंत यादवसोबत दीडशतकी भागीदारी करत भारताला पहिल्या डावात मोठ्या आघाडीच्या दिशेने नेले आहे.

तत्पूर्वी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीवर मजबूत पकड मिळवताना तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४५१ धावांची मजल मारली होती. भारताने ५१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली असून अजून ३ फलंदाज शिल्लक आहेत. विजयने १३६ धावांची दमदार खेळी केली. 

भारताची फलंदाजी आणि त्यात शनिवार असल्याने क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियमवर मोठी गर्दी केली. १ बाद १४६ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करताना भारताला दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. जॅक बॉलने चेतेश्वर पुजाराला त्रिफळाचीत करून भारतीय तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण केले. येथून इंग्लंड पुनरागमन करणार अशी चिन्हे दिसत होती; परंतु कोहलीने जबरदस्त ‘कॅप्टन इनिंग्ज’ करताना इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळविले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin