Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


मुंबई कसोटी - तिसऱ्या दिवस अखेरीस भारताच्या ७ बाद ४५१ धावा


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) -  कर्णधार कोहलीच्या नाबाद १४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाला वानखेडे कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताची धावसंख्या ७ बाद ४५१ अशी आहे. कोहलीच्यासाथीला जयंत यादव ३० धावांवर नाबाद आहे. 

मुरली विजयने यावेळी १३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर कोहलीने मैदानात कर्णधारी खेळी करून आपले १५ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले. मुरली विजयने पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी देखील आपला दमदार फॉर्म कायम ठेवत कसोटी कारकिर्दीतील आपले ८ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. उपहारापर्यंत भारताने २ बाद २४७ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात मुरली विजय फिरकीपटू रशीदच्या फूलटॉस चेंडूवर स्ट्रेड ड्राईव्ह मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

करुण नायर मोईन अलीच्या फिरकीवर १३ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळत नसताना जो रुटला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्याने आपल्या पहिल्या दोन षटकांत दोन विकेट्स घेऊन भारतावर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. जो रुटने पार्थिव पटेल याला २५ धावांवर तर अश्विनला शून्यावर बाद केले. 

इंग्लंडला सव्वातीनशे धावांत रोखू, असे अश्विनने गुरुवारी आत्मविश्वासाने सांगितले होते. पण त्याच्या आशा फोल ठरल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जोस बटलरने (७६) झुंजार खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला चारशे धावांपर्यंत पोहोचता आले. इंग्लंडने वानखेडेवरील सलग तिसऱ्या कसोटीत चारशे धावांचा टप्पा ओलांडून भारतावरील दडपण वाढवले आहे. याआधी २००६मध्ये ४०० आणि २०१२मध्ये ४१३ धावा उभारल्यानंतर ते दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin