Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

निवडणूक २0१७


प्रभाग क्रमांक ४६ - विजयनगर प्रभागात नारळ फोडण्याची घाई ; विकासकामे अर्धवट


Main News

>> कायम खोदकाम होत असल्याने प्रभागातील रस्त्यांची चाळण

>> चार वर्षांत नगरसेवकांनी कोणतेही भरीव काम केलेले नाही

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक ४६, विजयनगरमध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. दर दोन तीन महिन्यांनी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी खोदकाम केले जाते. विकासआराखड्यानुसार रस्त्यांचा विकास नाही. त्यामुळे आगीची घटना किंवा रुग्णाला नेण्यासाठी आग्निशामक किंवा अॅम्ब्युलन्स आतमध्ये जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. दररोज कचराउचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभागाच्याकडेने असलेले नदीपात्र भराव टाकून गिळंकृत करण्यात आले आहे. नदीला सीमाभींत बांधण्याचा प्रश्न आठवर्षांपासून प्रलंबित आहे. आरक्षणांचा विकासही केला जात नाही. विकासकामांचे केवळ भूमीपूजन करून नंतर ते अर्धवट अवस्थेत सोडले जातात. त्यामुळे चार वर्षांत प्रभागामध्ये कोणताही विकासझाला नसल्याचे प्रभागातील इच्छुकांनी सांगितले.


भाजपचे नगरसेवक प्रमोद ताम्हणकर आणि काँग्रेसच्या नगरसेविका विमल काळे हे प्रभाग क्रमांक ४६, विजयनगरचे प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रभागातून सुशील मिरगल, उमेश गुंड, छायापाटील, दिनेश नढे, सज्जी वर्की आणि सुरेश पाटील हे इच्छुक आहेत. त्यांच्याशी “पीसीबी टुडे”च्या टिमने संवाद साधला. प्रभागाच्या काही भागात पाणीपुरवठ्यासाठी चालू पंचवार्षिकमध्ये नवीनपाइपलाइन टाकण्यात आली. तरीही कमी दाबानेच पाणी येते. सोसायट्यांना स्वखर्चाने टँकरने पाणी मागवावे लागते. कायम रस्त्यांचे खोदकाम होत असल्याने नळजोडातून दूषित पाणी येते.प्रभागात दाट लोकवस्ती असूनही सांडपाणी व्यवस्थेची क्षमता वाढविली जात नाही. प्रभागातील ९० टक्के भागात भूमीगत सांडपाणी व्यवस्था आहे. परंतु आदर्शनगर भागात आजही खुली गटारेआहेत. सांडपाणी व्यवस्थेची वेळोवेळी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे चेंबर तुंबण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. वैभव कॉलनीजवळ चेंबर तुंबण्याचा प्रश्न आजतागायत नगरसेवकांनासोडविता आलेला नाही, असे इच्छुकांनी सांगितले.


प्रभागात दररोज तयार होणारे सांडपाणी मैलाशुद्धीकरण प्रकल्पाला जोडण्यात आलेले नाही. हे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडून दिले जाते. त्यामुळे नदीपात्रात जलपर्णी तयार होत असून,नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभागातील घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या दररोज येत नाहीत. दिवसाआड गाड्या येतात. एकदा गाडी भरली की पुन्हा पुढच्याघरांतील कचरा गोळा करण्यासाठी त्या येत नाहीत. त्यामुळे नागरिक मोकळी जागा दिसली की कचरा टाकतात. ओंकार कॉलनीजवळ नेहमीच कचरा पडलेला असतो. काळेवाडी पुलावर निर्माल्यकुंड नेहमी भरून वाहत असते. स्मशानभूमीच्या शेजारी कचरा डेपो आहे. तेथे प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या का येत नाहीत, याची माहिती घेऊन हाप्रश्न नगरसेवकांनी सोडविला पाहिजे, असे मत इच्छुकांनी व्यक्त केले.


प्रभागातील विद्युत व्यवस्था भूमीगत आहे. परंतु, डीपी धोकादायक बनले आहेत. अनेक डीपींचे दरवाजे गायब झाल्याने ते उघडे आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा पद्धतीने डीपीउभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. प्रभागात सर्वत्र विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. त्यांना एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. अनेकदा हे दिवे बंदअसतात. प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या चार वर्षांत प्रभागातील काही रस्त्यांचे एकदाच डांबरीकरण आणि तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. प्रभागातील रस्त्यांचे विकासआराखड्यानुसार रुंदीकरण केले गेलेले नाही. त्यामुळे प्रभागातील बहुतांश रस्ते अरूंद आहेत. आगीची घटना घडल्यास तसेच एखाद्या रुग्णाला नेण्याची वेळ आल्यास प्रभागातील रस्त्यांवरूनअग्निशामक दलाची गाडी किंवा अॅम्ब्युलन्स जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती असल्याचे इच्छुक म्हणाले.  


लकी बेकरी ते ओंकार कॉलनी या रस्त्यांवर रस्ता दुभाजक बसविण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्यांची दैनंदिन साफसफाई केली जात नाही. पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठीबसविण्यात आलेल्या पाइपलाइन मातीने भरलेल्या आहेत. मयूर मंगल कार्यालयाला पार्किंग नसल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होते. प्रभागात स्मशानभूमी वगळता कोणत्याचआरक्षणाचा विकास झालेला नाही. मैदान, उद्यान आणि शाळेसाठी प्रभागात आरक्षण आहे. उद्यानाच्या कामाचे भूमीपूजन पाच वर्षांपूर्वी झाले. आज पाच वर्षे होत आली तरी हे काम अद्याप पूर्णझालेले नाही. पवनानगरमध्ये महापालिकेची शाळा बांधण्याचे काही पाच वर्षांपासून सुरू आहे. मैदानाची जागा ताब्यात घेतली जात नाही. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही.स्मशानभूमीचीही दुरवस्था झाली होती. आता निवडणूक आल्यानंतर त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, असे इच्छुकांनी सांगितले. 


हा प्रभाग पवना नदीच्या काठावर वसलेला आहे. त्यामुळे प्रभागाला पुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नदीला सीमीभींत बांधण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या कामाला आठ वर्षांपूर्वीमंजुरीही मिळाली आहे. परंतु, एवढ्या वर्षांत या कामाला साधी सुरूवातही करण्यात आलेली नाही. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी या बीआरटीएस रस्त्यासाठी प्रभागातील काही घरे पाडण्यात आली.परंतु, आजतागायत रस्त्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. काम हाती घ्यायचेच नव्हते तर घरे कशासाठी पाडली आणि अनेक कुटुंबांना उघड्यावर का आणले?, असा सवाल इच्छुकांनी केला.तसेच या कुटुंबियांना अद्याप मोबदला मिळाला नसून, नगरसेवकांनी प्रयत्न केले नसल्याचे इच्छुक म्हणाले. प्रभागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रात राडारोडा टाकून गिळंकृत करण्यातआले आहे. काळेवाडी पुलाला लागून अनधिकृतपणे व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे इच्छुक म्हणाले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin